बेलवंडी फाटा परिसरातील वनहद्दीत झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:29 IST2020-06-06T16:28:26+5:302020-06-06T16:29:26+5:30
बेलवंडी फाटा येथील वनविभाग हद्दीमध्ये अवैधरित्या झाडांची कत्तल सुरू आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी येथील वनराईतील अनेक झाडांची कत्तल झाली आहे.

बेलवंडी फाटा परिसरातील वनहद्दीत झाडांची कत्तल
श्रीगोंदा : बेलवंडी फाटा येथील वनविभाग हद्दीमध्ये अवैधरित्या झाडांची कत्तल सुरू आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी येथील वनराईतील अनेक झाडांची कत्तल झाली आहे.
झाडे तोडून या जंगलावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न गेल्या महिन्यापासून सुरू आहे. नगर-दौंड महामार्गावर बेलवंडी फाटा येथे वनविभागाच्या हद्दीत दरवर्षी पावसाळ्यामध्ये शासनाकडून वृक्षसंवर्धन व लागवडीसाठी प्रोत्साहन देत अनेक कार्यक्रम हाती घेतले जातात.
वनविभागाच्या परिसरामध्ये झाडांची ज्वलनाच्या लाकडांसाठी इतर कामांसाठी देखील वृक्षांची अवैध रितीने तोडणी केली जात आहे. वृक्षतोड करणाºयांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र कारवाई होत नसल्याने पर्यावरण प्रेमींकडून खंत व्यक्त केली जात आहे.