चोघांचे जामीन फेटाळले

By Admin | Updated: November 15, 2014 23:37 IST2014-11-15T23:37:25+5:302014-11-15T23:37:53+5:30

अहमदनगर : केडगाव भागातील पंजाब अ‍ॅटो सर्व्हिस पेट्रोल पंपावर झालेल्या गोळीबार प्रकरणी चौघांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधिश ए.डी. तनखिवाले यांनी फेटाळले आहेत.

The defendants' bail denied | चोघांचे जामीन फेटाळले

चोघांचे जामीन फेटाळले

अहमदनगर : केडगाव भागातील पंजाब अ‍ॅटो सर्व्हिस पेट्रोल पंपावर झालेल्या गोळीबार प्रकरणी चौघांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधिश ए.डी. तनखिवाले यांनी फेटाळले आहेत.
पंजाब अ‍ॅटो पेट्रोल पंप हा सचिन जगताप यांच्या मालकीचा आहे. या पंपावरील कर्मचारी नितीन भोसले व रत्नेश क्षीरसागर यांनी पेट्रोल भरणाऱ्या वाहनधारकांना पैशाची मागणी केली असता त्यांनी कर्मचाऱ्यांवरच पिस्तूल रोखून गोळीबार केला होता. तसेच एक गोळी झाडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २० जुलै रोजी घडली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. कृपालसिंग मानवतसिंग गुज्जर, बंटी उर्फ राघवेंद्र अजमेरसिंग राजपूत, रवी भगवानदास शर्मा, अमीर सलीम बेग अशी आरोपींची नावे आहेत. चारही जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ३ गावठी कट्टे, ७ जीवंत काडतुसे जप्त केली होती. त्यानंतर चारही आरोपींनी रितसर जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केले होते. ते अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. आरोपींनी पंपावरील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व आरोपी परराज्यातील असल्याने त्यांना जामीन मंजूर केल्यास ते पुन्हा तपास कामात पोलिसांकडे हजर राहण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे त्यांचे अर्ज नामंजूर करावेत, असा युक्तीवाद अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड. सुरेश लगड यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: The defendants' bail denied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.