इंग्रजी शाळांचा २५ टक्के फी कमी करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:16 IST2021-06-05T04:16:02+5:302021-06-05T04:16:02+5:30
कोरोना महाभयंकर संकटामुळे बरीच कुटुंबे उद्ध्वस्त झाली. काहींचा रोजगार गेला तर काहींच्या घरात जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर १५ जूनपासून ...

इंग्रजी शाळांचा २५ टक्के फी कमी करण्याचा निर्णय
कोरोना महाभयंकर संकटामुळे बरीच कुटुंबे उद्ध्वस्त झाली. काहींचा रोजगार गेला तर काहींच्या घरात जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर १५ जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू करण्याची तयारी शासनाने चालवली आहे. शाळा चालू होत असल्याने इंग्रजी शाळांनी कोरोना संकटामुळे फी कपात करावी, अशी मागणी पालक व विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करण्याकरिता संघटनेची ऑनलाइन बैठक पार पडली. त्यात २०२१-२२ च्या शैक्षणिक सत्र शुल्कात २५ टक्के कपात करणे व कोरोनाने मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला, अशी माहिती मेस्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. देवीदास गोडसे पाटील यांनी दिली. या वेबिनारला जिल्हा उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब काळे, उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष केशव भवर, महिला अध्यक्ष सोनाली सालके, सचिव प्रा. अशोक चौधरी, प्रा. सतीश शिंदे, भाऊसाहेब भडांगे, शिवाजी मुंडे, तालुकाध्यक्ष जे. डी. मापारी, सागर, बनसोडे, डॉ. जितेंद्र शेळके, अंकुश पालवे, अनिकेत पठारे, सागर बोरुडे, भरत देशमुख, नागनाथ पानसरे, आर. के. पाटील, राजेंद्र ढवळे, शंतनू आढाव, सचिन अनारसे, भारत देशमुख आदी संस्थाचालक उपस्थित होते.
--------------