मिरजगावात दारुबंदीचा निर्णय
By Admin | Updated: May 6, 2017 14:57 IST2017-05-06T14:57:57+5:302017-05-06T14:57:57+5:30
शहरात दारूबंदी केली जाणार असून यापुढे शहरात दारूदुकानास ना हरकत दाखला दिला जाणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे़

मिरजगावात दारुबंदीचा निर्णय
आॅनलाइन लोकमत
मिरजगाव (अहमदनगर), दि़ ५ - शहरात दारूबंदी केली जाणार असून यापुढे शहरात दारूदुकानास ना हरकत दाखला दिला जाणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे़ या निर्णयाचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने पोलीस ठाण्याला कळविले आहे़
महामार्गावरील बिअरबार व वाईन शॉप बंद झाल्यामुळे ही दुकाने शहरात स्थापित करण्याबाबत या दुकान मालकांनी हालचाली सुरू केल्या आहेत़ याबाबत मिरजगाव ग्रामपंचायतीने गुरुवारी गावात दारुबंदी करण्याचा निर्णय घेत यापुढे कोणत्याही दारू दुकानाला ना हरकत दाखला दिला जाणार नाही, असे ग्रामपंचायतीने पोलीस यंत्रणेला कळविले आहे़ महामार्गावरील ही दुकाने बंद झाल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू झाली आहे़ चौकाचौकात दारू मिळू लागल्याने अनेक तरूण व्यसनाच्या आहारी गेले आहे. शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असून यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शहरातून दारू हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.