विषबाधेने दोन चिमुरड्यांचा मृत्यू; आई-वडिलांसह बहिण अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:04 IST2017-10-14T10:13:09+5:302017-10-14T14:04:48+5:30

अहमदनगर : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला तर आई-वडिलांसह त्यांची एक लहान बहिणही अत्यवस्थ आहे. ही घटना ...

Death of two chicks by poisoning; Sister-in-law with her parents | विषबाधेने दोन चिमुरड्यांचा मृत्यू; आई-वडिलांसह बहिण अत्यवस्थ

विषबाधेने दोन चिमुरड्यांचा मृत्यू; आई-वडिलांसह बहिण अत्यवस्थ

अहमदनगर : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला तर आई-वडिलांसह त्यांची एक लहान बहिणही अत्यवस्थ आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे घडली.
गुहा येथील उ-हे वस्ती रस्त्यावर शौकत शेख हे कुटूंबासमवेत राहतात, गुरुवारी रात्री हे कुटूंब जेवण करुन झोपी गेले. मात्र, पहाटेच्यावेळी कुटुंबातील सर्वांना त्रास होऊ लागला़ त्यामुळे सर्वांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. उपचारादरम्यान शौकत शेख यांची बरीना शेख ही ३ वर्षांची मुलगी व दानिश शेख हा ४ वर्षांचा मुलगा यांचा मृत्यू झाला. शौकत शेख, त्यांची पत्नी हिना शेख व १ वर्षाची मुलगी मुरेना शेख यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: Death of two chicks by poisoning; Sister-in-law with her parents