दुचाकी अपघातात मातेचा मृत्यू; मुले जखमी
By Admin | Updated: May 12, 2017 16:03 IST2017-05-12T16:03:46+5:302017-05-12T16:03:46+5:30
नगर-सोलापूर रोडवर वाळुंज (ता़ नगर) परिसरात पारगाव मौला फाट्यानजिक ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली़

दुचाकी अपघातात मातेचा मृत्यू; मुले जखमी
आॅनलाइन लोकमत
अहमदनगर दि़ १२ - नगर-सोलापूर रोडवर वाळुंज (ता़ नगर) परिसरात पारगाव मौला फाट्यानजिक ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली़ तर तिचा मुलगा व मुलगी दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
संगीता अनिल कोंड (वय ४५, रा़ सर्जेपुरा, नगर) या मुलगा व मुलीसह देवदर्शनासाठी सोलापूरच्या दिशेने निघाले होते़ दरम्यान त्यांची दुचाकी वाळूंज परिसरात आली असता पाठिमागून आलेल्या ट्रक (क्ऱ एम़एच़ १५, ई़जी़ ३९३७) ने दुचाकीला (क्ऱ एम़एच़ १४, डी़पी़ ८३९७) जोरदार धडक दिली़ यात संगीता अनिल कोंड (वय ४५, रा़ सर्जेपुरा, नगर) या जागीच ठार झाल्या़ तर मुलगा व मुलगी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ अपघाताची माहिती समजताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले, पोलीस नाईक बापूसाहेब फोलाणे, पोलीस नाईक भांबारकर हे तातडीने घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवून वाहतूक सुरळीत केली़