चार कोरोना रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST2021-03-10T04:22:09+5:302021-03-10T04:22:09+5:30
मंगळवारी २१५ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार ४४२ इतकी झाली ...

चार कोरोना रुग्णांचा मृत्यू
मंगळवारी २१५ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार ४४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२८ टक्के इतके झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९४, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११४ आणि अँटिजेन चाचणीत २७ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (५८), जामखेड (६), कर्जत (१६), कोपरगाव (२१), पारनेर (१६), पाथर्डी (१२), राहाता (३०), राहुरी (७), संगमनेर (२७), शेवगाव (५), कॅन्टोन्मेंट (३), इतर जिल्हा (१), अकोले (१), नगर ग्रामीण (८), नेवासा (१३), श्रीगोंदा (१), कॅन्टोन्मेंट (४), इतर जिल्हा (५) येथील रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी एकूण मृत्युसंख्या ११५७ इतकी होती, ती मंगळवारी ११६१ झाल्याचे यंत्रणेच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
----------------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : ७५४४२
उपचार सुरू असलेले रुग्ण : १७५६
मृत्यू : ११६१
एकूण रुग्णसंख्या : ७८३५९