विजेचा शॉक बसलेल्या कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:29 IST2021-02-26T04:29:44+5:302021-02-26T04:29:44+5:30

देवकौठे येथील अतिशय गरीब कुटुंबातील निवृत्ती शंकर मुंगसे वीज वितरण कंपनीत कंत्राटी वीज कामगार म्हणून कार्यरत होते. दि. १८ ...

Death of an electric shock worker | विजेचा शॉक बसलेल्या कामगाराचा मृत्यू

विजेचा शॉक बसलेल्या कामगाराचा मृत्यू

देवकौठे येथील अतिशय गरीब कुटुंबातील निवृत्ती शंकर मुंगसे वीज वितरण कंपनीत कंत्राटी वीज कामगार म्हणून कार्यरत होते. दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अधिकृतपणे इलेक्ट्रिक शटडाऊन घेऊन ते पारेगाव बुद्रुक शिवारात वीज खांबावर चढून काम करीत होते. दरम्यान, अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्यांना जबर शॉक लागला व ते खांबावरून खाली कोसळले. तेव्हापासून ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना प्रथम संगमनेर येथील तांबे हॉस्पिटलमध्ये व तेथून तातडीने नाशिक येथील सोपान हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर सोपान हॉस्पिटलमधून त्यांना अशोका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात होते. सहा दिवसांपासून निवृत्ती मुंगसे हे बेशुद्ध अवस्थेत होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास निवृत्ती मुंगसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक १२ वर्षांचा मुलगा व १० वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Death of an electric shock worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.