टँकरच्या धडकेने अपंग तरूणाचा मृत्यू; सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:06 IST2020-02-26T13:05:38+5:302020-02-26T13:06:30+5:30
सोनई-शिंगणापूर रस्त्यावर मुळा कारखाना गेट समोर एका दुधाच्या रिकाम्या टँकरने शिंगणापूर येथील अपंग तरुणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष जयराम बानकर असे या मयत झालेल्या अपंग तरुणाचे नाव आहे.

टँकरच्या धडकेने अपंग तरूणाचा मृत्यू; सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील अपघात
सोनई : सोनई-शिंगणापूर रस्त्यावर मुळा कारखाना गेट समोर एका दुधाच्या रिकाम्या टँकरने शिंगणापूर येथील अपंग तरुणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष जयराम बानकर असे या मयत झालेल्या अपंग तरुणाचे नाव आहे.
२४ फेब्रुवारीच्या रात्री १०:१५ चे दरम्यान दूध टँकरची (क्र.एम.एच.-१६, अ.-८५५६) सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील मुळा कारखाना गेटसमोर हॉटेल नागेशजवळ कुबड्यावर पायी जात असलेल्या संतोष जयराम बानकर (वय ३५, रा. शनिशिंगणापूर) याला धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मयताचे नातेवाईक भाऊसाहेब ज्ञानदेव बानकर (वय ४३, रा. शनिशिंगणापूर) यांनी सोनई पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. टँकर चालक रवींद्र राजेंद्र केदार (रा. लोळेगाव, ता. शेवगाव) याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची पोलिसांनी नोंद केली आहे. अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे. संतोष बानकर हे शनैश्वर देवस्थानचे कर्मचारी आहेत. नेत्रदान विभागात काम करीत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, भाऊ, वडिल असा परिवार आहे.