जामखेडमध्ये टॅक्ट्ररच्या धडकेने चिमुरडीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 18:42 IST2018-06-14T18:42:16+5:302018-06-14T18:42:33+5:30
घरासमोरील रस्त्यावर लहान पाच वर्षांची चिमुरडी खेळत असताना भरधाव वेगाने येणा-या टॅक्ट्ररने जोराची धडक दिली. या धडकेने गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.

जामखेडमध्ये टॅक्ट्ररच्या धडकेने चिमुरडीचा मृत्यू
जामखेड : घरासमोरील रस्त्यावर लहान पाच वर्षांची चिमुरडी खेळत असताना भरधाव वेगाने येणा-या टॅक्ट्ररने जोराची धडक दिली. या धडकेने गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.
याबाबत लक्ष्मण महादेव घुमरे (रा. संकल्प कॉलनी जामखेड) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवार (दि.१३जून) रोजी साक्षी योगेश घूमरे (वय-५, रा. संकल्प कॉलनी जामखेड) ही घरासमोरील रस्त्यावर खेळत होती. आरोपी दिपक मारूती साबळे हा त्याच्या ताब्यातील टॅक्ट्रर ( टॅक्ट्रर क्रमांक एम. एच. -१६, ऐ.एम.-३४२८) भरधाव वेगाने चालवून साक्षी हिस जोराची धडक दिली. या धडकेने साक्षी गंभीर जखमी झाली. तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला. फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी दिपक मारूती साबळे यांच्यावर २७९, ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.