संगमनेरमध्ये तलावात बुडून मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 16:25 IST2019-08-24T16:25:04+5:302019-08-24T16:25:10+5:30
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील पाझर तलावात दहा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली

संगमनेरमध्ये तलावात बुडून मुलाचा मृत्यू
घारगाव : संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील पाझर तलावात दहा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. यश बबन थोरात (वय १०, रा. नांदूर खंदरमाळ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नांदूर खंदरमाळ येथील पाझर तलाव पावसाच्या पाण्यामुळे भरला आहे. शनिवारी सकाळी नांदूरखंदरमाळ येथील पोलीस पाटील किसन पंढरीनाथ सुपेकर हे पाझर तलावाजवळून जात असताना त्यांना एक मुलगा तळ्यात बुडाल्याचे दिसले. नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने तळ्यातून मुलाला बाहेर काढले. घारगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटील किसन सुपेकर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.