शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 00:37 IST

दिवसभरात हल्ल्याच्या दोन घटना

अहमदनगर: शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर सायंकाळी हल्ला झाल्यानंतर  भाजपचा कार्यकर्ता व सराईत गुन्हेगार विजय रासकर याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शहरातील सारसनगर येथे घडली. या हल्ल्यात मयूर राऊत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राऊत हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. रासकर आणि राऊत याच्यात जुने वाद आहेत.

शनिवारी रात्री सारसनगर येथे राऊत आणि रासकर हे समोरासमोर आले, तेव्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी रासकर याने राऊत यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राऊत याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.  भिंगार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेनंतर विजय रासकर हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भिंगारकॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. रासकर याच्यावर भिंगार पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो भाजप आमदाराचा कार्यकर्ता आहे. सायंकाळी कापड बाजारात सागर थोरात या शिवसैनिकावर हल्ला झाला. हा हल्ला भाजप खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र यांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस