घारगाव येथे भरदिवसा घरफोडी; रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 13:34 IST2020-06-24T13:33:46+5:302020-06-24T13:34:19+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव (शिंदेवाडी) येथे सोमनाथ शिंदे यांच्या घरी २३ जून रोजी दुपारी २ वाजता चोरट्यांनी घरफोडी केली. यावेळी चोरट्यांनी २२ हजार रुपयांची रोकड पळविली आहे.

Daytime burglary at Ghargaon; Cash lengthened | घारगाव येथे भरदिवसा घरफोडी; रोकड लांबविली

घारगाव येथे भरदिवसा घरफोडी; रोकड लांबविली

घारगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव (शिंदेवाडी) येथे सोमनाथ शिंदे यांच्या घरी २३ जून रोजी दुपारी २ वाजता चोरट्यांनी घरफोडी केली. यावेळी चोरट्यांनी २२ हजार रुपयांची रोकड पळविली आहे.

शिंदे यांच्या घरातील सर्व जण सकाळी शेतात कामाला गेले होते. दुपारी चोरट्यांनी लोखंडी टॉमीने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील  सामानाची, कपाटाची उचकापाचक केली. घरातील २२ हजार  रुपयांची  रोख रक्कम  घेऊन पलायन केले. अडीच वाजता सोमनाथ शिंदे घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. 
 
याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात सोमनाथ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस  तपास करीत आहेत. 

Web Title: Daytime burglary at Ghargaon; Cash lengthened