उद्योजकावर भरदिवसा खुनी हल्ला

By Admin | Updated: April 2, 2016 00:34 IST2016-04-02T00:26:25+5:302016-04-02T00:34:28+5:30

शेवगाव : येथील उद्योजक संजय श्रीराम सबलोक (वय ५१) यांच्यावर शुक्रवारी सकाळी प्राणघातक हल्ला झाला. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही.

A day-night assassin attack on the businessman | उद्योजकावर भरदिवसा खुनी हल्ला

उद्योजकावर भरदिवसा खुनी हल्ला

शेवगाव : येथील उद्योजक संजय श्रीराम सबलोक (वय ५१) यांच्यावर शुक्रवारी सकाळी प्राणघातक हल्ला झाला. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेनंतर पळून गेलेल्या दोन मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. सबलोक नेवासा रस्त्यावरील मशिनरी दुकानात थांबले असताना विना नंबरच्या मोटारसायकलवरून तोंड बांधून आलेल्या या दोघांनी सबलोक यांच्या डोक्यात दांडके मारून त्यांना गंभीर जखमी केले. दोघेही हिंदीत बोलत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेनंतर दोघेही पसार झाले.

Web Title: A day-night assassin attack on the businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.