देवगडचे दत्त मंदिर दर्शनासाठी पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:38+5:302021-03-21T04:20:38+5:30

नेवासा : कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी पुन्हा शनिवारपासून (दि.२०) श्री ...

Datta temple in Devgad closed again for darshan | देवगडचे दत्त मंदिर दर्शनासाठी पुन्हा बंद

देवगडचे दत्त मंदिर दर्शनासाठी पुन्हा बंद

नेवासा : कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी पुन्हा शनिवारपासून (दि.२०) श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या वतीने दत्त मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे, इतर दुकाने बंद ठेवलेली आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.

श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर हे रुग्ण संख्या कमी होत नाही, तोपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. दरम्यान मंदिरातील नित्यपूजा, आरती ही नियमित सुरू राहील. परंतु, बाहेरगावाहून आलेल्या यात्रेकरू, पर्यटकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले असणार नाही. दत्त मंदिर, पंचमुखी सिद्धेश्वर मंदिर, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर ही देवालये बंद असतील. प्रवरापात्रात नौकाविहार तसेच परिसरात असणारी छोटी हॉटेल्स, प्रसादालय, दुकाने हेही बंद असतील. कोरोनाची रूग्ण संख्या कमी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मंदिर परिसर हा पूर्ववत सुरू केला जाईल, असे आवाहन भास्करगिरी महाराजांनी केले आहे.

Web Title: Datta temple in Devgad closed again for darshan