सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी दत्ता काकडे; उपाध्यक्षपदी अनिल गिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:49 IST2019-11-03T13:48:44+5:302019-11-03T13:49:36+5:30
महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे, उपाध्यक्षपदी लोहसर येथील सरपंच अनिल गिते तर नाशिक विभागीय अध्यक्षपदी अविनाश आव्हाड यांची निवड करण्यात आली़.

सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी दत्ता काकडे; उपाध्यक्षपदी अनिल गिते
अहमदनगर : महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे, उपाध्यक्षपदी लोहसर येथील सरपंच अनिल गिते तर नाशिक विभागीय अध्यक्षपदी अविनाश आव्हाड यांची निवड करण्यात आली़.
सरपंच परिषदेच्या कार्यकारिणीची निवड नुकतीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली़. सामाजिक क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात महाराष्ट्रात भरीव काम करणारे सरपंच नेते दत्ता काकडे यांची सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी, अनिल गिते यांची उपाध्यक्षपदी, सचिवपदी बार्शी (जि़ सोलापूर) येथील अॅड़ विकास जाधव यांची निवड करण्यात आली़. या बैठकीत राज्याची नूतन कार्यकारणी निवडण्यात आली़. त्यात कैलास गोरे (सोलापूर), माऊली वायाळ (जालना), पांडुरंग नागरगोजे (बीड), जितेंद्र भोसले (सातारा), राणी पाटील (कोल्हापूर), अविनाश आव्हाड (नाशिक), वरिष्ठ जगताप, शिवाजी मोरे (कोल्हापूर), किसन जाधव (ठाणे), पांडुरंग पोतनीस (आजरा), सुप्रिया जेथे (अलिबाग) नारायण वणवे यांची निवड झाली़.