‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 13:16 IST2018-08-08T13:16:08+5:302018-08-08T13:16:26+5:30

आषाढी वद्य कामीका एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील ‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी लोटलेल्या लाखो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष केला़

Dash of devotees for 'paas' pole darshan | ‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

नेवासा : आषाढी वद्य कामीका एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील ‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी लोटलेल्या लाखो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष केला़ या जयघोषाने गुरुवारी नेवासा नगरी दुमदुमली. माऊलीच्या आषाढी वद्य कामीका एकादशीनिमित्त आज पहाटे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते माऊलीच्या ‘पैस’ खांबास अभिषेक करण्यात आला.
नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो दिंड्यांनी येथे हजेरी लावली होती. शहरातील रस्ते भाविकांच्या गदीर्ने फुलून गेले होते. ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिरातही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी अकरापर्यंत एक ते दीड लाख भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले़ दिवसभरात पाच लाखापर्यंत भाविकांची उपस्थिती येथे राहील,असे शिवाजी महाराज देशमुख यांनी सांगितले.
श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख यांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी पंचगंगा सिडस व जयहरी परिवार, रवी तलवार मुस्लिम समाजबांधव, मारुतराव घुले पतसंस्था, मध्यमेश्वर पतसंस्थेच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.

 

Web Title: Dash of devotees for 'paas' pole darshan