सोशल मीडियावरील बिनधास्त वावर धोक्याचा : रेवती देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 15:53 IST2021-03-24T15:53:12+5:302021-03-24T15:53:38+5:30

त्यामुळे सोशल मीडियाचा मर्यादितच वापर करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. रेवती देशपांडे यांनी केले.

Dangerous on social media: Revati Deshpande | सोशल मीडियावरील बिनधास्त वावर धोक्याचा : रेवती देशपांडे

सोशल मीडियावरील बिनधास्त वावर धोक्याचा : रेवती देशपांडे

अहमदनगर: विद्यार्थ्यांचा सोशल मीडियावरील बिनधास्त वावर धोक्याचा ठरत आहे. या माध्यमांचा अतिवापर झाला तर नैराश्य येऊन मूळ ध्येयापासून भरकटण्याची शक्यता असते. त्यामुळे सोशल मीडियाचा मर्यादितच वापर करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. रेवती देशपांडे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर शहर बार असोशिएशन व सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथील कौडेश्वर महाविद्यालय व जिल्हा प्राथमिक शाळेत मंगळवारी कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी देशपांडे बोलत होत्या. कौटुंबिक हिंसाचाराचा प्रतिबंध आपल्या घरापासूनच करावा तसेच समाजात वावरताना महिलांनी एकमेकांना आदर दयावा. दैनंदिन जीवनात सामाजिक बांधीलकीही जोपासावी, असे आवाहन यावेळी देशपांडे यांनी केले.

मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १ कोटीपेक्षा अधिक रक्कम पिडीत ग्रस्तांना मंजुर केली असल्याची माहिती देशपांडे यांनी सांगितली. यावेळी मुख्याध्यापक पोपट पवार व सुनंदा ठोकळ तसेच शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

 

अनुराधा आठरे-येवले यांनी विद्यार्थ्यांना हुंडा प्रतिबंधक कायदा त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी महिलांना लैगिंक अत्याचारापासुन संरक्षण कायदा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्याथ्यांना हुंडा देणार किंवा घेणार नाही असे शपथ घेण्याचे आवाहन केले. प्रास्तविक मुख्यध्यापक पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रविण शेरकर यांनी तर विकास कर्डीले यांनी आभार मानले.प्रास्तविक मुख्यध्यापक पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रविण शेरकर यांनी तर विकास कर्डीले यांनी आभार मानले.

Web Title: Dangerous on social media: Revati Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.