वाळूतस्कराची शुल्क निरीक्षकास धक्काबुक्की

By Admin | Updated: January 14, 2016 23:05 IST2016-01-14T22:45:45+5:302016-01-14T23:05:53+5:30

अहमदनगर: गौण खणिज विभागाने औरंगाबाद महामार्गावर वाहन आडवे लावून वाळूचा डंपर पकडला़ पकडलेला डंपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे घेऊन जात असताना चालकाने मध्येच वाहन थांबविले

Damaskskirch Charge Inspector Blasts | वाळूतस्कराची शुल्क निरीक्षकास धक्काबुक्की

वाळूतस्कराची शुल्क निरीक्षकास धक्काबुक्की

अहमदनगर: गौण खणिज विभागाने औरंगाबाद महामार्गावर वाहन आडवे लावून वाळूचा डंपर पकडला़ पकडलेला डंपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे घेऊन जात असताना चालकाने मध्येच वाहन थांबविले व धक्काबुक्की करीत कर्मचाऱ्यास जबरदस्तीने खाली उतरवून पळ काढला़ या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
जिल्ह्यातील वाळूतस्करांची मुजोरी चांगलीच वाढली आहे़ त्याचा अनुभव दस्तूर खुद्द जिल्हा खणिकर्म अधिकाऱ्यांना गुरुवारी आला़ नेवासा तालुक्यातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा खणिकर्म अधिकारी बामने यांच्या नेतृत्वाखाली पथक औरंगाबाद मार्गावरून नेवासाकडे निघाले होते़ मात्र महामार्गावरील पोखर्डी गावाच्या शिवारात उजनीकडे जाणाऱ्या चौकातून वाळूने भरलेले डंपर भरधाव वेगाने नगरकडे जात असल्याचे त्यांना आढळून आले़ बामने यांनी वाहनचालकास थांबण्याचा इशारा केला़ मात्र चालकाने डंपर थांबविले नाही़ तो नगरच्या दिशेने निघाला़ पथकाने डंपरचा पाठलाग केला़
पथकाने पुढे येऊन गजराजनगर जवळ जीप आडवी लावली व डंपर पकडून त्याची तपासणी केली़ सदर डंपरमध्ये चार ब्रास वाळू असल्याचे आढळून आले़ शिवाय डंपरवर कुठेही क्रमांक दिसून आला नाही़ विना क्रमांकाच्या डंपरमधून वाळची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बामने व त्यांच्या पथकाने नाव काय? वाळू कुठून आणली?, अशी विचारणा चालकाकडे केली़ मात्र चालकाने सांगण्यास नकार दिला़ पकडलेले वाहन बामने यांनी अनिल सदावर्ते यांच्या ताब्यात दिले व त्यांना वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले़ वाहन चालकास घेऊन सदावर्ते कार्यालयाकडे निघाले़ वाहन कार्यालयाकडे निघून गेल्याची खात्री करून बामने त्यांच्या पुढील मोहिमेवर निघाले़ काही अंतरावर आल्यानंतर चालकाने डंपर थांबविले़ शेजारी बसलेल्या शुल्क निरीक्षक सदावर्ते यांना खाली उतरण्यास सांगितले़ पण, ते उतरले नाही़ मात्र चालकाने त्यांना धक्काबुक्की केली व जीवे मारण्याची धमकी दिली़
दोघांत झटापट झाली़ अखेर चालकाने सदावर्ते यांना डंपरच्या खाली ढकलून दिले़ दोघांच्या झटापटीत चालकाचा भ्रमणध्वनी सदावर्ते यांच्या हाती लागला़ चालकाने डंपरमधील वाळू रस्त्याच्या बाजूला खाली केली़
वाळू खाली करून चालक तेथून पसार झाला़ सदर घटनेची माहिती मिळताच बामने त्यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत़
(प्रतिनिधी)

Web Title: Damaskskirch Charge Inspector Blasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.