डाकले महाविद्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:24+5:302021-09-05T04:25:24+5:30
बँकिंग स्पर्धेचे उद्घाटन श्रीरामपूर : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ध्येय निश्चिती केली पाहिजे. तीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे आवाहन ...

डाकले महाविद्यालयात
बँकिंग स्पर्धेचे उद्घाटन
श्रीरामपूर : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ध्येय निश्चिती केली पाहिजे. तीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांनी केले.
येथील चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयात आयबीपीएस बँकिंग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. विजय कुंभार, प्राचार्य डॉ. एन.एस. गायकवाड, प्राचार्य डॉ. एम.एस. पोंधे, प्रभारी प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर ऑनलाइन उपस्थित होते.
डॉ. विजय कुंभार यांनी आर्थिक साक्षरता व डिजिटल साक्षरता आधुनिक काळाची गरज आहे. ई-बँक, आभासी बँक, ई-करन्सी, डिजिटल करन्सी या संकल्पना समजावून घेतल्या पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.बापूसाहेब घोडके यांनी केले. आभार प्रा. प्रदीप यादव यांनी मानले.
---------