अहिल्यादेवी पुरस्काराने दुर्गाताई तांबे सन्मानित

By Admin | Updated: August 23, 2014 00:43 IST2014-08-22T23:25:36+5:302014-08-23T00:43:57+5:30

संगमनेर : शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना मुंबईत प्रदान करण्यात आला.

Dahajtai Tambe honored by Ahilyadevi Award | अहिल्यादेवी पुरस्काराने दुर्गाताई तांबे सन्मानित

अहिल्यादेवी पुरस्काराने दुर्गाताई तांबे सन्मानित

संगमनेर : शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना मुंबईत प्रदान करण्यात आला.
महिला बचत गट, महिला सबलीकरण, पर्यावरण, समाजकारण, शैक्षणिक आधुनिकीकरण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तांबे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्यमंत्री फौजिया खान, माजी खासदार एकनाथ गायकवाड, कांचनताई थोरात, गायक नंदेश उमाप, अभिजीत कोसंबी, प्रधान सचिव उज्वल मुके, आयुक्त राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. रोख १ लाख रूपये, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरणप्रसंगी निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे, पद्मा थोरात, मीरा चकोर, प्रमिला अभंग, शालिनी ढोले, सुनीता कांदळकर, वंदना गुंजाळ, जुलेखा शेख, मनिषा शिंदे, डॉ. नामदेव गुंजाळ, तुषार गायकर, जालिंदर ढोक्रट, नामदेव कहांडळ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dahajtai Tambe honored by Ahilyadevi Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.