दादासाहेब नलगे यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:52+5:302021-01-03T04:21:52+5:30

लक्ष्मणराव नलगे यांना सुधीर व दादासाहेब ही दोन मुले. मुळगाव श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला होते. पण नलगे ...

Dadasaheb Nalge commits suicide | दादासाहेब नलगे यांची आत्महत्या

दादासाहेब नलगे यांची आत्महत्या

लक्ष्मणराव नलगे यांना सुधीर व दादासाहेब ही दोन मुले. मुळगाव श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला होते. पण नलगे कुटुंब व्यवसायाच्या निमित्ताने दौंड येथे राहत होते. दादासाहेब हे दौंड येथील व्यवहार पाहत होता.

त्यांच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होता.

दादासाहेब गेल्या एक महिन्यापासून आजारी होते. या आजारपणातून किंवा इतर कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केली का? हे पोलीस तपासात पुढे येईल.

दादासाहेब यांनी काही दिवसांपूर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर फोटो टाकले. त्यानंतर ही घटना घडली. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

दादासाहेब नलगे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात नेला आहे. वैद्यकीय अहवाल हाती आल्यानंतरच आत्महत्येचे गूड उलगडणार आहे.

...

०२दादासाहेब नलगे

....

Web Title: Dadasaheb Nalge commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.