टाकळीभानमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:05 IST2019-05-09T19:05:31+5:302019-05-09T19:05:40+5:30

येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून त्याने बोकडाचा फडशा पाडल्याने खळबळ उडाली आहे. प्रविण दिलीप परदेशी यांच्या वस्तीवर शेळ्यांचा मुक्त गोठा आहे.

Dabble in Turbani | टाकळीभानमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

टाकळीभानमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

टाकळीभान : येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून त्याने बोकडाचा फडशा पाडल्याने खळबळ उडाली आहे. प्रविण दिलीप परदेशी यांच्या वस्तीवर शेळ्यांचा मुक्त गोठा आहे. त्याला सर्व बाजूंनी संरक्षक तार आहे. मात्र तरीही बुधवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान तारीवरून उडी मारून आत प्रवेश करत एका बोकडाचा फडशा पाडला. त्यानंतर बिबट्या पसार झाला. गोठ्यातील जनावरांचा ओरडण्याचा आवाज ऐकूण परदेशी कुटुंब घराबाहेर आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. यापूर्वीही परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.

 

Web Title: Dabble in Turbani