विसपुते सराफांनी दिलेली सायकल मुलींना प्रगतीची वाट दाखवील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST2021-09-15T04:25:15+5:302021-09-15T04:25:15+5:30

विसपुते चांदी दालनाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवान, होतकरू ११ विद्यार्थिनींना नुकत्याच ...

The cycle given by Vispute Saraf will make the girls wait for progress | विसपुते सराफांनी दिलेली सायकल मुलींना प्रगतीची वाट दाखवील

विसपुते सराफांनी दिलेली सायकल मुलींना प्रगतीची वाट दाखवील

विसपुते चांदी दालनाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवान, होतकरू ११ विद्यार्थिनींना नुकत्याच अवर सचिव प्रवीण मुंडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक सायकल भेट देण्यात आल्या. यामध्ये श्रद्धा मोहनराव रणछोड (रांजणगाव), गीतांजली सोमासे (चासनळी), साक्षी बोराडे, पूनम पोटफोडे, तेजश्री चव्हाण (टाकळी), वैष्णवी हुलगुंडे (महालखेडा), राजेश्वरी गरुड (बक्तरपूर), सायली गवळी (मढी), मुस्कान पठाण (कोळपेवाडी) या विद्यार्थिनींचा समावेश आहे.

याप्रसंगी दीपक विसपुते, पूनम विसपुते, यश विसपुते यांनी सत्कार केला. प्रास्ताविक पेढीचे युवा संचालक यश विसपुते यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन आनंद क्षेमकल्याणी यांनी केले. शिवम दाभाडे यांनी आभार मानले. (वा.प्र.)

...........

फोटोओळी

कोपरगाव येथील विसपुते सराफ यांच्या वतीने ११ गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.

...........

फोटो१४ - विसपुते सराफ सायकल - कोपरगाव

140921\img-20210914-wa0018(1).jpg

फोटो१४ - विसपुते सराफ सायकल - कोपरगाव 

Web Title: The cycle given by Vispute Saraf will make the girls wait for progress