दुकानातील कामगारानेच रचला कट; डोळ्यात मिरची टाकून लुटली रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST2021-09-19T04:22:01+5:302021-09-19T04:22:01+5:30
लखन नामदेव वैरागर (वय २९, रा. नागापूर), प्रमोद बाळू वाघमारे (२३, रा. नागापूर), विशाल भाऊसाहेब वैरागर (२५, रा. रस्तापूर, ...

दुकानातील कामगारानेच रचला कट; डोळ्यात मिरची टाकून लुटली रक्कम
लखन नामदेव वैरागर (वय २९, रा. नागापूर), प्रमोद बाळू वाघमारे (२३, रा. नागापूर), विशाल भाऊसाहेब वैरागर (२५, रा. रस्तापूर, ता. नेवासा) व दीपक राजू वाघमारे (रा. नागापूर) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. आरोपींकडून पाच लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम, मोटारसायकली, मोबाईल असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर शहरातील औरंगाबाद रोडवरील प्रकाश वाईन्स शॉपमधील व्यवस्थापक अशीर बशीर शेख हा १२ सप्टेंबर रोजी रात्री दुकानातील पैसे घेऊन घरी जात होता. याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी शेख याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून पैसे लुटले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, वाईन्स शॉपमधील कामगार लखन वैरागर यानेच साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली आहे. त्यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, हेड कॉन्स्टेबल संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, पोलीस नाईक रवी सोनटक्के, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, संदीप चव्हाण, भरत बुधवंत, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
------
फोटो १८ एलसीबी
डोळ्यात मिरचीपूड टाकून पैसे लुटणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.