शिर्डी विमानतळावरून काकडी ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 15:50 IST2017-10-05T15:48:31+5:302017-10-05T15:50:55+5:30

शिर्डी विमानतळास जागा दिलेल्या काकडी ग्रामस्थांनाच विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रवेश नाकारून अपमानास्पद वागणूक दिल्याने काकडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे याबाबत पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी १२ आॅक्टोबरला ग्रामसभाच बोलाविण्यात आली आहे.

Cucumber villager angry at Shirdi airport | शिर्डी विमानतळावरून काकडी ग्रामस्थ संतप्त

शिर्डी विमानतळावरून काकडी ग्रामस्थ संतप्त

ठळक मुद्देउद्घाटनप्रसंगी प्रवेश नाकारून अपमानास्पद वागणूक१२ आॅक्टोबरला विशेष ग्रामसभा

उद्घाटनाला डावलले : १२ आॅक्टोबरला विशेष ग्रामसभा
अस्तगाव : शिर्डी विमानतळास जागा दिलेल्या काकडी ग्रामस्थांनाच विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रवेश नाकारून अपमानास्पद वागणूक दिल्याने काकडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे याबाबत पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी १२ आॅक्टोबरला ग्रामसभाच बोलाविण्यात आली आहे.
२ आॅक्टोबरची विशेष ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करून ४ आॅक्टोबरला ही सभा ठेवण्यात आली होती. पण ४ तारखेस फक्त औपचारिक चर्चा करून १२ आॅक्टोबरला सकाळी ९ वाजता विशेष ग्रामसभा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
काकडी गावातील ग्रामस्थांनी जमीन देऊन एवढे मोठे योगदान दिले असतानाही उद्घाटनस्थळी ग्रामस्थांनाच प्रवेश नाकारण्यात आला. उलट त्यावेळी ग्रामस्थांना घराबाहेर पडण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला. या अपमानास्पद वागणुकीमुळे काकडी ग्रामस्थ संतापले आहेत. याशिवाय काकडी गावातील अनेक प्रकल्पग्रस्तांना सरकारने शब्द दिल्याप्रमाणे अजून नोकºया दिलेल्या नाहीत. जमिनीचा योग्य मोबदला नाही. तसेच सध्या विमानतळावर काकडी ग्रामस्थांना येऊ दिले जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जमीन अधिग्रहणाचे काम सुरू असताना सरकारकडून गावासाठी अनेक आश्वासने देण्यात आली. पण त्याची पूर्तता झाली नाही. या बाबींच्या पाठपुराव्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. विमानतळात ज्या ज्या ग्रामस्थांना नोकरी दिली आहे, त्यांना विमानतळ प्राधिकरण केव्हाही काढू शकते. त्यामुळे जे तेथे नोकरीस लागले आहेत, त्यांनीसुद्धा ग्रामसभेला यावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
तेराशे एकर शेतजमीन विमानतळास दिली
गाव एकत्र नसल्याचा फायदा विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे. प्राधिकरण काकडी ग्रामस्थांना जर विमानतळावर येऊ देत नसेल तर त्यांनासुद्धा आमच्या ग्रामपंचायत हद्दीतून जाण्याचा अधिकार नाही. काकडी गावातील जवळपास १३०० एकर शेतजमीन विमानतळात गेलेली आहे. पण सरकारला आमच्या योगदानाची जाणीव नाही. त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: Cucumber villager angry at Shirdi airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.