प्रवेशासाठी होणार गर्दी...
By Admin | Updated: June 7, 2014 00:17 IST2014-06-06T23:10:51+5:302014-06-07T00:17:58+5:30
अहमदनगर : बारावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन पध्दतीने जाहीर झाला. पुणे विभागात यंदाही नगर जिल्ह्याने बाजी मारली.
प्रवेशासाठी होणार गर्दी...
अहमदनगर : बारावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन पध्दतीने जाहीर झाला. पुणे विभागात यंदाही नगर जिल्ह्याने बाजी मारली. गतवर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी वाढल्याने त्याचा परिणाम पुढील प्रवेशावर होणार आहे. जिल्ह्यात एफवायसह, फार्मसी, इंजिनिअरिंग आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या मर्यादित जागा असल्याने यंदा सर्वत्र प्रवेशासाठी गर्दी होणार आहे.
जिल्ह्यात बारावी सायन्सची परीक्षा देणाऱ्या २४ हजार ३८२ विद्यार्थ्यांपैकी २३ हजार ४८० विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. या विद्यार्थ्यांना फार्मसी व इंजिनिंअरिंगसाठी प्रयत्न करावयाचे झाल्यास त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. शहरात इंजिनिअरिंगची केवळ पाच महाविद्यालये असून प्रथम वर्ष बीईची प्रवेश क्षमता १ हजार ६८० आहे. तर फार्मसीची आठ महाविद्यालये असून यात अवघ्या ४८० जागा आहेत.
यामुळे सायन्स विभागाचा लागलेला निकाल आणि या दोन प्रमुख विभागातील जागांची स्थिती पाहता पालक आणि विद्यार्थ्यांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. नुकताच एमएच सीईटीचा निकाल आॅनलाईन पध्दतीने जाहीर झाला असून या परीक्षेच्या मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शास्त्र विभागातील प्रवेशाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. जिल्ह्यात सायन्य वगळता, कला आणि वाणिज्य विभागाच्या निकालाची टक्केवारी वाढलेली आहे. यामुळे एफवाय प्रवेशासाठी त्यांना धावपळ करावी लागणार आहे. विशेष करून शहरात निवडक महाविद्यालयांना अधिक मागणी असल्याने त्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू नाही. मात्र, बारावीच्या निकालाची मूळ प्रत मिळताच सर्व विभागातील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती न्य आर्ट्सचे साबळे यांनी दिली.
(प्रतिनिधी)
अशा आहेत जागा...
1न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये एफवायच्या अनुदानीत ६००, विनाअनुदानीत १२०, बी. कॉमच्या अनुदानीत ६००, बीएसीच्या अनुदानीत ३६० व विनाअनुदानीत १२० जागा आहेत. या पारंपरिक अभ्यासक्रमा सोबतच बी.एस्सी ( वाईन टेक्नॉलॉजी), विनाअनुदानीत ३०,बायोटेक्नॉलॉजीच्या विनाअनुदानीत १६०, बीसीएच्या विनाअनुदानीत १६०, बीबीएच्या विनाअनुदानीत १६० आणि एफवायबीएससी (अॅनिमेशन) च्या विनाअनुदानीत ६० जागा आहेत.
2सारडा महाविद्यालयात एफवायबीएच्या अनुदानीत २४०, विनाअनुदानीत २४० जागा, बी. कॉमच्या अनुदानीत २४० आणि विनाअनुदानीत ८० जागा, बीसीएच्या विनाअनुदानीत ८० जागा आहेत.
3सर्वात जुने महाविद्यालय म्हणून ओळख असणाऱ्या नगर महाविद्यालयात एफवायबीएच्या ४८० जागा, बीबीएच्या १६०, बी कॉम ३६०, बीएससी २४०, बीसीए १६०, बीसीएस (बायोटेक) ६० जागा आहेत.
4नगर शहरासह लोणी (ता. राहाता) संगमनेर, कोपरगाव या ठिकाणी मोठ्या शिक्षण संस्था आहेत. त्या ठिकाणी जिल्ह्यासह राज्यातून विद्यार्थ्यांचा शासकीय कोट्यातून आॅनलाईन प्रवेश होत असल्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आणि पालकांची मागणी मोठी असते.