माणिकदौंडी आराेग्य केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST2021-04-27T04:22:04+5:302021-04-27T04:22:04+5:30
माणिकदौंडी : पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तब्बल अठरा गावांचा भार या ...

माणिकदौंडी आराेग्य केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी
माणिकदौंडी : पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तब्बल अठरा गावांचा भार या आरोग्य केंद्रावर आहे. त्यामुळेही येथे गर्दी होत असून येथे कर्मचारी संख्या कमी असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची कसरत होत आहे.
माणिकदौंडी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत २४ हजार २८० लोकसंख्येचा भार आहे. सध्या या केंद्रांतर्गत कोरोना रुग्णांची संख्या ९५ असून एकाचा मृत्यू झाला आहे. आल्हानवाडी, घुमटवाडी, जाटदेवळा, शिरसाटवाडी आदी उपकेंद्रे या अंतर्गत येतात. माणिकदौंडी येथे कोरोना लसीकरणासाठी अठरा गावांतील नागरिक येत आहेत. त्यामुळे येथे गर्दी होत असून लसीकरणासाठी वादाचे प्रसंग घडत आहेत. या केंद्रामध्ये आतापर्यंत ८७६ जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे.
येथे कर्मचारी वर्ग अपुरा असल्यानेही उर्वरित कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. एक आरोग्य सहाय्यिका, दोन आरोग्य सेवक, दोन आरोग्य सेविका, एक चार चाकी वाहनाची येथे नितांत गरज आहे. तसेच गर्दी कमी व्हावी यासाठी आरोग्य उपकेंद्रांमध्येही लसीकरणाची व्यवस्था व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
---
२६ माणिकदौंडी
माणिकदौंडी येथील आरोग्य केंद्रात महिलेला लस देताना परिचारिका.