नगरमध्ये गर्दी; पोलिसांनी केली दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 16:40 IST2020-06-02T16:39:16+5:302020-06-02T16:40:27+5:30
अहमदनगर शहरातील कापड बाजारात मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गर्दी झाल्याने पोलिसांनी काही वेळ दुकाने बंद केली होती.

नगरमध्ये गर्दी; पोलिसांनी केली दुकाने बंद
अहमदनगर : शहरातील कापड बाजारात मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गर्दी झाल्याने पोलिसांनी काही वेळ दुकाने बंद केली होती.
व्यावसायिकांनी नियमांचे पालन करणार असल्याचे सांगितल्यानंतर दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली. नगर शहरातील भवानीनगर व माळीवाडा परिसरात सोमवारी दोन कोरूनाबाधित रुग्ण आढळले होते. मंगळवारी दुपारी कापड बाजारात मोठी गर्दी झाली होती. बहुतांशी दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहक एकाच वेळी खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी अशी दुकाने बंद करण्यास सांगितले. तसेच पोलिसांनी कापडबाजार परिसरात फिरून नियमांचे पालन करण्याचे व सामाजिक अंतर ठेवण्याचे व्यवसायिकांना आव्हान केले. अर्ध्या तासानंतर ही दुकाने उघडण्यात पोलिसांनी परवानगी दिली.
शहरात पुन्हा कोरूनाबाधित रुग्ण आढळून आल्याने कापडबाजार बंद करण्यात येणार असल्याची अफवा शहरात पसरली होती. दरम्यान याबाबत माहिती समजताच आमदार संग्राम जगताप यांनी बाजारपेठेत येऊन व्यापाºयांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत दुकाने सुरू ठेवावीत असे आवाहन केले.
एकाच वेळी नागरिकांनी दुकानात गर्दी करू नये, नियमांचे पालन करावे. यासंदर्भात पोलिसांनी कापड बाजारातील व्यावसायिकांना सूचना दिलेल्या आहेत. दुकाने बंद करण्याचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.