स्वबळाच्या भाषेने इच्छुकांची गर्दी
By Admin | Updated: December 18, 2015 23:15 IST2015-12-18T23:09:07+5:302015-12-18T23:15:36+5:30
अहमदनगर: महापालिकेच्या प्रभाग ११ व १५ मधील पोटनिवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा कॉँग्रेसने केली असून सेनेकडे असलेल्या या जागांवर भाजपनेही दावा सांगितला आहे.

स्वबळाच्या भाषेने इच्छुकांची गर्दी
अहमदनगर: महापालिकेच्या प्रभाग ११ व १५ मधील पोटनिवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा कॉँग्रेसने केली असून सेनेकडे असलेल्या या जागांवर भाजपनेही दावा सांगितला आहे. भाजपने दावा सोडला नाही तर युतीचा घटकपक्ष असलेला भाजपही स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या दोन प्रभागातील निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय मनसेही निवडणूक रिगणात उतरण्याची चिन्हे आहेत.
प्रमुख असलेल्या चार पक्षांनी स्वबळाची भाषा सुरू केल्याने उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्यांनी पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. उमेदवारी देताना राजकीय पक्षाची कोंडी होणार आहे.
अखेरचे तीन दिवस शिल्लक...
महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी चौथ्या दिवसाखेर एकही अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची संख्या मात्र वाढत गेली. युती, आघाडीत एकत्रितपणे निवडणूक लढायची की स्वतंत्र, याचा निर्णय होत नसल्याने उमेदवारीचा गुंता वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रभाग ११ व १५ मधील दोन जागेसाठी १० जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे. १५ डिसेंबरपासून उमेदवारी अर्जाची विक्री व स्वीकृती सुरू झाली आहे. २२ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. शुक्रवारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, सेना व भाजपच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. सेना-भाजपची युती तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय होत नसल्याने उमेदवार निश्चिती होत नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
पोटनिवडणूक होत असलेल्या प्रभागाच्या दोन्ही जागा सार्वत्रिक निवडणुकीच्या जागा वाटपात सेना व राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी भाजप व कॉँग्रेसनेही स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. स्वतंत्रपणे निवडणूक न लढता युती व आघाडी करुनच निवडणूक लढविण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहे. त्याला यश मिळत नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विलंब होत आहे. (प्रतिनिधी)