पाचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:30+5:302021-03-24T04:19:30+5:30
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे पश्चिम भागातील गावात कांदा, डाळिंब, गहू, द्राक्षे, भाजीपाला या ...

पाचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे पश्चिम भागातील गावात कांदा, डाळिंब, गहू, द्राक्षे, भाजीपाला या ५०० हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोपरगाव तालुक्यात शुक्रवारपासून पावसाचे वातावरण आहे. पूर्व भागातील काही गावांत शुक्रवारपासून सोमवारपर्यंत सलग चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या उलट पश्चिम भागातील पोहेगाव परिसरातील सोनेवाडी, चांदेकसारे, डाऊच, घारी, जेऊर कुंभारी, देर्डे मढी, राजणगाव देशमुख, बहादरपूर, बहादराबाद, जवळके, शहापूर, राजणगांव देशमुख या गावात रविवारी व सोमवारी या दोन दिवसांत सुसाट वारा, विजांचा कडकडाटासह पाऊस, गारपीट झाली.
....
...असे झाले नुकसान
४४५ शेतकऱ्यांचा २८० हेक्टर कांदा
१८६ शेतकऱ्यांचा ११५ हेक्टर गहू,
४१ शेतकऱ्यांचे २२ हेक्टर डाळिंब बाग
८० शेतकऱ्यांची ५६ हेक्टर मका
२७ शेतकऱ्यांचा १४ हेक्टर भाजीपाला
११ शेतकऱ्यांच्या ७ हेक्टरवरील द्राक्ष बाग
एकूण ७९० शेतकऱ्यांच्या ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
........
कोपरगाव तालुक्यात गारपिटीत नुकसान झालेल्या सात गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी यांना कळविली आहे. येत्या दोन-दिन दिवसांत नुकसानी संदर्भातील रकमेची माहिती समोर येईल.
- योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव