कोल्हार शिवारात १९६ हेक्टर्समधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 15:47 IST2017-10-05T15:45:10+5:302017-10-05T15:47:05+5:30

कोल्हार : कोल्हार भगवतीपूर परिसरात २० सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हार बुद्रुक शिवारातील सुमारे ४६० शेतकºयांच्या १९६ हेक्टर्स क्षेत्रातील पिकांचे ...

Crop damage to 196 hectares in Kolhar Shivar | कोल्हार शिवारात १९६ हेक्टर्समधील पिकांचे नुकसान

कोल्हार शिवारात १९६ हेक्टर्समधील पिकांचे नुकसान

ठळक मुद्दे२० सप्टेंबरची अतिवृष्टीघास व कपाशीला सर्वाधिक फटका

कोल्हार : कोल्हार भगवतीपूर परिसरात २० सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हार बुद्रुक शिवारातील सुमारे ४६० शेतकºयांच्या १९६ हेक्टर्स क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. १०२ हेक्टर्स क्षेत्रातील घासपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
घासपिकांसह नुकसान झालेल्या इतर पिकांचे पंचनामेही कृषी विभागाने पूर्ण केले आहेत. कोल्हार बुद्रुक शिवारातील नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे कृषी सहाय्यक डी. सी. तांबे, तलाठी जाधव व ग्रामविकास अधिकारी पी.ए. सुकेकर यांच्या पथकाने पूर्ण केले. त्यानुसार १०२ हेक्टर्स घासपिकाच्या खालोखाल सुमारे ५४ हेक्टर्स क्षेत्रातील सोयाबीन व ४० हेक्टर्स क्षेत्रातील कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कोल्हार भगवतीपूर येथे भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकºयांच्या व्यथा समजावून घेतल्या. तसेच महसूल विभागाच्या अधिकाºयांना नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर तहसीलदारांनी त्वरित कार्यवाही करुन महसूल व कृषी खात्याची संयुक्त पथके नियुक्त केली. या पथकांना कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर, पाथरे, हणमंतगाव व लोणी शिवारातील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Crop damage to 196 hectares in Kolhar Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.