मॅसेज पाठविल्याच्या कारणावरून मारहाण,राहुरीत चौघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:57 IST2017-12-12T15:55:29+5:302017-12-12T15:57:48+5:30

टाकळीमियॉ : मोबाईलवरून मॅसेज का पाठविला, असा प्रश्न विचारीत टाकळीमियॉ (ता. राहुरी ) येथील महेश गायकवाड यास घरात घुसून मारहाण ...

Criminal offense against four persons in rahuri due to beating for sending messages | मॅसेज पाठविल्याच्या कारणावरून मारहाण,राहुरीत चौघांविरुद्ध गुन्हा

मॅसेज पाठविल्याच्या कारणावरून मारहाण,राहुरीत चौघांविरुद्ध गुन्हा

टाकळीमियॉ : मोबाईलवरून मॅसेज का पाठविला, असा प्रश्न विचारीत टाकळीमियॉ (ता. राहुरी) येथील महेश गायकवाड यास घरात घुसून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिलाबाई गायकवाड यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे, माझे पती चंद्रकांत व मुलगा महेश हे घरात टिव्ही बघत असताना चौघांनी मारहाण केली. या फिर्यादीवरून गिरीष निमसे, अक्षय निमसे, प्रताप निमसे व राजेंद्र निमसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अनिल गायकवाड हे करीत आहेत.

 

Web Title: Criminal offense against four persons in rahuri due to beating for sending messages