दुय्यम निबंधकाविरुध्द लाच घेतल्याचा गुन्हा
By Admin | Updated: June 25, 2014 00:32 IST2014-06-24T23:41:17+5:302014-06-25T00:32:03+5:30
शेवगाव : शेतजमिनीच्या खरेदीखताची सत्यप्रत देण्यासाठी चारशे रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी शेवगाव दुय्यम निबंधक दिलीप निऱ्हाळी यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुय्यम निबंधकाविरुध्द लाच घेतल्याचा गुन्हा
शेवगाव : शेतजमिनीच्या खरेदीखताची सत्यप्रत देण्यासाठी चारशे रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी शेवगाव दुय्यम निबंधक दिलीप निऱ्हाळी यांच्यासह दोघांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
खासगी इसमाविरुध्द लाच
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील शेतजमिनीच्या खरेदीखताची सत्यप्रत देण्यासाठी खासगी इसम महाजन यांच्यामार्फत दुय्यम निबंधक निऱ्हाळी यांनी चारशे रुपयांची लाच मागितली.
पथकाचा सापळा
या प्रकरणी तक्रारदाराने नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.२४) दुपारी ४.२५ च्या सुमारास दुय्यम निबंधक कार्यालय शेवगाव येथे तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना संबंधितास रंगेहात पकडले.
विभागाच्या पथकात पोलीस उपअधीक्षक अशोक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी, विजय मुर्तडक, पो.नाईक प्रमोद जरे, रवींद्र पांडे, नितीन दराडे, राजेंद्र सावंत, वसंत वाव्हळ यांचा समावेश होता.
(तालुका प्रतिनिधी)