झावरे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:26 IST2021-09-12T04:26:00+5:302021-09-12T04:26:00+5:30
पारनेर : आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानचे राज्य सचिव, वनकुटेचे सरपंच ॲड.राहुल झावरे यांच्या विरोधात शुक्रवारी उशिरा पारनेर पोलीस ठाण्यात ...

झावरे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा
पारनेर : आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानचे राज्य सचिव, वनकुटेचे सरपंच ॲड.राहुल झावरे यांच्या विरोधात शुक्रवारी उशिरा पारनेर पोलीस ठाण्यात मिनीनाथ सूर्यभान बर्डे यांच्या फिर्यादीवरून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. गावातील मिनिनाथ बर्डे, प्रल्हाद पवार, नाथा बर्डे हे ॲड.झावरे यांच्याकडे गेले होते. त्यावेळी येडूमाता मंदिराला सभामंडप मंजूर झाला असून, त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीचा ठराव द्यावा, अशी मागणी केली. त्यावर झावरे यांनी तुला काय करायचे ते कर, तुला सांगितलेले कळत नाही का, असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना ॲड.राहुल झावरे म्हणाले, बर्डे यांना मारहाण किंवा शिवीगाळही केलेली नाही. ही फिर्याद त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून, तसेच दबावापोटी दिली असावी. केवळ राजकीय आकसातून हा प्रकार केला आहे.