हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोघांवर गुन्हा; शिंगणापुरात कोपरगाव पोलिसांची कारवाई
By रोहित टेके | Updated: May 24, 2023 17:02 IST2023-05-24T16:56:47+5:302023-05-24T17:02:19+5:30
Ahmednagar: शिंगणापूर परिसरातील नारंदी नदीच्या लगत असलेल्या काटवनात हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोघांवर पोलिसांनी बुधवारी (दि. २४) वेगवेगळ्या कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.

हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोघांवर गुन्हा; शिंगणापुरात कोपरगाव पोलिसांची कारवाई
- रोहित टेके
कोपरगाव (जि. अहमदनगर ): तालुक्यातील शिंगणापूर परिसरातील नारंदी नदीच्या लगत असलेल्या काटवनात हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोघांवर पोलिसांनी बुधवारी (दि. २४) वेगवेगळ्या कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ४३ हजार रुपये किमतीची ४३० लिटर हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी पो.कॉ. गणेश काकडे यांनी श्रावन भरत गायकवाड व नानासाहेब कारभारी गायकवाड (दोघे रा. मनाई वस्ती, शिंगणापुर ता. कोपरगाव ) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.