अवैद्य दारू विकणाऱ्या तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:21 IST2021-04-07T04:21:48+5:302021-04-07T04:21:48+5:30
कोपरगाव : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैद्यरित्या दारूची विक्री करणाऱ्या तिघांवर कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले ...

अवैद्य दारू विकणाऱ्या तिघांवर गुन्हा
कोपरगाव : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैद्यरित्या दारूची विक्री करणाऱ्या तिघांवर कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहे. ही कारवाई सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास व मंगळवारी (दि. ६) दुपारी ५ वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे.
सोमवारी मध्यरात्री पोलीस नाईक रामकृष्ण खारतोडे यांनी शहरातील खंदकनाला परिसरात विनानंबरच्या दुचाकीवरून दारूचा बॉक्स घेऊन जाणाऱ्या सागर शंकर गिरमे व रवींद्र निंबा साळुंके (दोघे रा. येसगाव ता. कोपरगाव) यांच्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील दारूच्या बॉक्स व दुचाकी असा १८ हजार २८० रुपयांचा मुदेमाल हस्तगत केला आहे. तर मंगळवारी पोलीस हवालदार संभाजी शिंदे यांनी शहरातील हनुमानगर येथे विक्रम सुदाम चंदनशिव (वय ३७, रा. १०५ हनुमाननगर, कोपरगाव) हा त्याच्या घरात दारूची विक्री करीत असताना त्याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्याकडून १,३०० रुपये किमतीच्या २५ दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.