शिक्षक आत्महत्याप्रकरणी गटशिक्षणाधिकाºयांवर गुन्हा
By Admin | Updated: April 27, 2017 15:04 IST2017-04-27T15:04:33+5:302017-04-27T15:04:33+5:30
आत्महत्येला जबाबदार धरत हवेली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षक आत्महत्याप्रकरणी गटशिक्षणाधिकाºयांवर गुन्हा
आ नलाइन लोकमतअहमदनगर, दि़ २७ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली क्र. १ चे शिक्षक जीवन रामचंद्र वाघमारे (वय ३२) यांच्या आत्महत्येला जबाबदार धरत हवेली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमारे यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी शिवारात मंगळवारी विष घेऊन आत्महत्या केली होती.वाघमारे हवेली तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी आहेत. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली क्र. १ येथे प्राथमिक शिक्षक होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. शिक्षक संघाने केलेल्या आवाहनावरून तालुक्यांतील सुमारे ९५ टक्के शाळा बंद होत्या.गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार या तीन महिन्यांपूर्वी वाघोली परिसरातील एका खासगी शाळेच्या तपासणीसाठी गेल्या असता शाळेचे पदाधिकारी व शिक्षकांनी परिहार व त्यांच्यासोबत असलेल्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराची तक्रार परिहार यांनी न करता वाघमारे यांच्यासह सहा शिक्षकांनी करावी, असे सांगण्यात आले होते. परंतु हे सहा शिक्षक घटनास्थळी उपस्थित नव्हते म्हणून त्यांनी तक्रार करण्यास नकार दिला. यामुळे वाघमारे यांच्यासह सहा शिक्षकांना आपणांवर शिस्तभंगाची कारवाई व निलंबन का करू नये, अशी नोटीस देण्यात आली होती.यात अविनाश फडतरे, शिवाजी नवले, विनायक गोडाम, जीवन वाघमारे, संभाजी सातपुते, अमर गौळी यांचा समावेश होता. तर केंद्रप्रमुख निर्मला धुमाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वाघमारे (वय ३२) यांच्या आत्महत्येशी आमचा काही संबंध नाही, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हवेली तालुका शिक्षक संघाने केली आहे. कारवाई न झाल्यास ४ मे रोजी मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.