अशोकनगर येथील क्रिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:34+5:302021-03-10T04:21:34+5:30
श्रीरामपूर : अशोकनगर येथील जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत नगर येथील साईदीप संघ विजेता ठरला. नगरच्या ...

अशोकनगर येथील क्रिकेट
श्रीरामपूर : अशोकनगर येथील जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत नगर येथील साईदीप संघ विजेता ठरला. नगरच्या पायोनियर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अलिम एन्टरप्राइजेस (गंगापूर ) संघाने तृतीय व प्रदीप स्पोटर्स (मुंबई) संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला. स्पर्धेत अथर्व तायडे याला मालिकावीर बहुमान मिळाला. आहद मलिक उत्कृष्ट फलंदाज व आकाश आहेर उत्कृष्ट गोलंदाज ठरला.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते विजेत्यांना चषक प्रदान करण्यात आला. यावेळी अशोकचे अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ, उपाध्यक्ष पोपटराव जाधव, सोपान राऊत, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, माजी सभापती प्रा. सुनीता गायकवाड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, अल्ताफ शेख, युवा नेते निरज मुरकुटे, बॉबी बकाल, संजय राजळे, आप्पासाहेब दुशिंग, अनिल उंडे, राहुल पटारे, बाबन शेख, महेश टंकसाळे, कान्हा खंडागळे, बाबा सय्यद, जुबेर इनामदार आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी बापू कोळसे, भैया शेख, सुधा तावडे, शेखर म्हसे, जमिल पठाण, मुन्ना सय्यद, संदीप अरसुले, मुन्ना खान, पप्पू मलिक, सुनील ढमाले, वसीम सय्यद, सूरज पिंपळे, अशोक साळवे, योगेश वर्पे आदींनी प्रयत्न केले.
------