समता पतसंस्थेचा देशातील पतसंस्थांनी आदर्श घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:21+5:302021-01-08T05:04:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ ठेव वाढीमध्येच नाही तर सेवा देण्यात उच्चांक प्रस्थापित केला ...

समता पतसंस्थेचा देशातील पतसंस्थांनी आदर्श घ्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ ठेव वाढीमध्येच नाही तर सेवा देण्यात उच्चांक प्रस्थापित केला असल्याने देशातील बँकांनी या पतसंस्थेचा आदर्श घ्यावा, असे कामकाज समता पतसंस्थेचे आहे. आर्थिक प्रगतीचे पुढचे पाऊल ओळखून समताने पुढील वाटचाल सुरू केली आहे. पुढील ५ वर्षांनंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत महाराष्ट्रात अव्वल असेल त्यामुळे समताचे अनुकरण इतर सहकार चळवळीतील पतसंस्था करतील, असे गौरवोद्गार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान संचालक सतीश मराठे यांनी काढले.
कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने घरपोहोच सोनेतारण व लॉकर सुविधेचा तसेच क़्यू. आर. कोडच्या यू.पी.आय. सिस्टीमचे उद्घाटन सतीश मराठे व पतसंस्था फेडरेशनचे संचालक व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे होते. रविवारी ३ जानेवारीपासून घरपोहोच सोनेतारण व लॉकर सुविधा ग्राहक व सभासदांसाठी सुरू करण्यात आली आहे. प्रास्ताविक संचालक संदीप कोयटे यांनी केले.
काका कोयटे म्हणाले, समताचा प्रगतीचा प्रवास हा सभासदांचा आमच्यावर असलेल्या विश्वास आणि त्यांची घेत असलेली काळजी होय. आम्ही ग्राहक, सभासदांसाठी विविध सामाजिक उपक्रम व योजनांमधून त्यांना फायदा व्हावा, त्यांना सर्व योजनांची माहिती व्हावी. यासाठी सभासदांच्या दृष्टीने विविध विषयांच्या चित्रफिती तयार करून प्रसिद्धीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केले जात आहे. कोरोनातही ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या. त्यामुळेच समता ही शहरापुरतीच मर्यादित नसून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहे.
या कार्यक्रमाला दादाराव तुपकर, अरविंद महापात्रा, मसऊद अत्तार, समता पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड, मुख्य कार्यालयातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
............
फोटो०४ - कोपरगाव समता पतसंस्था उदघाटन
..
ओळी-
कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या घरपोहोच सोनेतारण व लॉकर सुविधांचे उद्घाटन सतीश मराठे, उदय जोशी यांनी केले.
040121\img-20210102-wa0013.jpg
समता पतसंस्थेचा घरपोहोच सोनेतारण व लॉकर सुविधेचा श्रीगणेशा करतांना सतीश मराठे, उदय जोशी, काका कोयटे, संदीप कोयटे, सचिन भट्टड.