कर्मचाऱ्यांची केली कोविड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:54+5:302021-06-20T04:15:54+5:30

माळवाडगाव केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शेख, अशोकनगर उपकेंद्रातील डॉ.श्यामल उंडे, एम.पी. बारसे, बी.एम. खडके, दीपक त्रिभुवन, गोविंद सरोदे या ...

Covid test of employees | कर्मचाऱ्यांची केली कोविड चाचणी

कर्मचाऱ्यांची केली कोविड चाचणी

माळवाडगाव केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शेख, अशोकनगर उपकेंद्रातील डॉ.श्यामल उंडे, एम.पी. बारसे, बी.एम. खडके, दीपक त्रिभुवन, गोविंद सरोदे या कर्मचाऱ्यांमार्फत कारखान्यातील एकूण ७० कर्मचाऱ्यांचे घशातील स्राव घेऊन ते नगरला तपासणीसाठी पाठविण्यात आले. टप्प्याटप्प्याने उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली जाणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ यांनी सांगितले. याप्रसंगी भाऊसाहेब कहांडळ, पोपटराव जाधव, सोपान राऊत, आप्पासाहेब दुशिंग, नारायण चौधरी, विश्वनाथ लवांडे, भाऊसाहेब दोंड, नानासाहेब लेलकर, मिलिंद कुलकर्णी, रवींद्र तांबे, राजेंद्र उंडे, विक्रांत भागवत, संतोष जाधव, संजय मोरगे, दीपक केदारी उपस्थित होते.

..............................

अंगणवाडी ग्रामीण मुलांचा पाया

श्रीरामपूर : अंगणवाडी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा पाया आहे. त्यामुळे अंगणवाड्यात कालसुसंगत शिक्षण सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत स्मार्ट अंगणवाडी योजना राबविली जात असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी दिली.

जिल्हा परिषद स्मार्ट अंगणवाडी योजने अंतर्गत बेलापूरयेथील शनी मंदिर अंगणवाडीची निवड करण्यात आली. या अंतर्गत अंगणवाडीचे रंगकाम, सोलर सीस्टिम बसविणे, एज्युकेशनल प्रिंटिंग, ई-लर्निंग सॉफ्टवेअर व हार्डवेअर, स्वच्छता किट आदी कामे करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी सदरची माहिती दिली. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, रमेश काळे, सद्दाम आतार, मच्छिंद्र खोसे, अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन नगरकर, अमोल साळवे आदी उपस्थित होते.

Web Title: Covid test of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.