तिसगावात ऑक्सिजन सुविधेचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:42+5:302021-05-01T04:19:42+5:30
तिसगाव : तिसगाव (ता.पाथर्डी) येथे श्री हॉस्पिटल व वैद्यकीय व्यावसायिकांच्यावतीने तीस ऑक्सिजन बेडचे अद्ययावत कोविड सेंटर बुधवारी सुरू करण्यात ...

तिसगावात ऑक्सिजन सुविधेचे कोविड सेंटर
तिसगाव : तिसगाव (ता.पाथर्डी) येथे श्री हॉस्पिटल व वैद्यकीय व्यावसायिकांच्यावतीने तीस ऑक्सिजन बेडचे अद्ययावत कोविड सेंटर बुधवारी सुरू करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्याम वाडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे, सरपंच काशिनाथ लवांडे आदींच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. दानशूर व्यक्तींचा सहभाग वेळोवेळी लाभत असल्याने प्रशासनाचा ताण हलका होत आहे. शहरी भागात तर ऑक्सिजन बेडच मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. तिसगावच्या वैद्यकीय व्यावसायिकांना सोबत घेऊन श्री हॉस्पिटलने ग्रामीण भागात अद्ययावत आरोग्यदालन सुरू करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे श्याम वाडकर यांनी सांगितले. डॉ. समर रणसिंग यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महेश बारगजे यांनी आभार मानले. उद्योजक कपील अग्रवाल, डॉ. बाबासाहेब होडशिळ, डॉ. पांडुरंग गाडे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब लवांडे प्रसंगी हजर होते.