शेवगाव येथे १०० बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:41+5:302021-04-30T04:25:41+5:30
शेवगाव : शहरात आमदार मोनिका राजळे यांच्या आदी फाउंडेशनच्या वतीने शंभर बेडचे लोकनेते गोपीनाथ मुंडे कोविड केअर सेंटर उभारण्यात ...

शेवगाव येथे १०० बेडचे कोविड सेंटर
शेवगाव : शहरात आमदार मोनिका राजळे यांच्या आदी फाउंडेशनच्या वतीने शंभर बेडचे लोकनेते गोपीनाथ मुंडे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. येथे दिव्यांगांसाठी ३० स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोविड सेंटरचे उद्घाटन बुधवारी जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रमुख राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, तहसीलदार अर्चना पागिरे, गट विकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिराणी, ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉ.रामेश्वर काटे, भाजप तालुकाध्यक्ष ताराभाऊ लोढे, महिला तालुकाध्यक्ष आशा गरड, रोहिणी फलके आदी उपस्थित होते.
यावेळी सावली बहुउद्धेशीय दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख यांनी राजळे यांनी दिव्यांगांसाठी कोविडच्या उपचारासाठी राज्यात सर्वप्रथम स्वतंत्र कक्षाची निर्मिती केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, तहसीलदार अर्चना पागिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिराणी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. नीरज लांडे, डॉ.विजय फलके, डॉ.विजय लांडे, डॉ.सूरज सुसे, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक गणेश कोरडे, सागर फडके, दिगंबर काठावटे, वाय. डी. कोल्हे, नितीन मालानी, संदीप खरड, कैलास सोनावणे, रामकिसन तापडिया, गंगा खेडकर, सुभाष बडधे, महादेव पवार, नवनाथ कवडे, सूरज लांडे, मुसाभाई शेख, प्रा.कल्याण देवढे, बाळासाहेब झिरपे, हरिश शिंदे, नवनाथ फासाटे आदी उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील रासने यांनी प्रास्तविक तर सुरेश बाबर यांनी सूत्रसंचालन केले. बापूसाहेब पाटेकर यांनी आभार मानले.
---
२८शेवगाव कोविड
शेवगाव येथील १०० बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन करताना मान्यवर.