शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

'त्या' सैराट प्रकरणाला वेगळं वळण; पतीनेच पत्नीला पेटवलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 12:41 IST

पारनेर तालुक्यातील निघोज गावात घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. पोलीस तपासात जखमी झालेला फिर्यादी मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुक्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे येत आहे.  

ठळक मुद्देपारनेर तालुक्यातील निघोज गावात घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. पोलीस तपासात जखमी झालेला फिर्यादी मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुक्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे येत आहे.   पोलिसांनी स्थानिक व्यक्तींकडे, रुक्मिणीच्या लहान भावंडांकडे कसून चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. 

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील निघोज गावात घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. पोलीस तपासात जखमी झालेला फिर्यादी मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुक्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे येत आहे.  अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक मनीष कलवानीया, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळाला भेट देत स्थानिक व्यक्तींकडे, रुक्मिणीच्या लहान भावंडांकडे कसून चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. 

सहा महिन्यांपूर्वी मंगेश व रुक्मिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. विवाहाला दोघांच्याही कुटुंबांचा विरोध नव्हता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच मंगेशने रुक्मिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणांवरून तो तिला मारहाण करायचा. घटनेच्या आधी सलग तीन दिवस मंगेशने रुक्मिणीला मारहाण करत होता. या मारहाणीला कंटाळून रुक्मिणी माहेरी निघून गेली. त्यानंतर रुक्मिणीची आई मोलमजुरीला जाताना रुक्मिणी व तिच्या लहान भावंडांना घरात ठेवून दाराला बाहेरुन कुलूप लावत असे. घटनेच्या दिवशी घरात रुक्मिणीसह तिची लहान भावंडे, निंनचू (६), करिश्मा (५), विवेक (३) होते. आई घराला बाहेरुन कुलूप लावून मोलमजुरीसाठी निघून गेली. वडीलही मजुरीसाठी बाहेर पडले होते.

रूक्मिणीच्या आई-वडीलांचे घर लाकडी खांडांचे आहे. घराच्या माळवदाचे एक खांड पडलेले आहे. याची संधी साधत १ मे रोजी मंगेशने पडलेल्या भागातून घरातून प्रवेश केला. मंगेशने सोबत बाटलीतून पेट्रोल आणले होते. सोबत आणलेले पेट्रोल मंगेशने रुक्मिणीच्या अंगावर ओतले व तिला पेटवले. रुक्मिणीने पेट घेतल्यावर तिने मंगेशला मिठी मारली. आरडाओरडा व घरातून येणारे धुराचे लोट पाहून परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजाला कुलूप असल्याने टिकावाच्या सहाय्याने दरवाजा तोडण्यात आला. गंभीर भाजलेल्या अवस्थेतील रूक्मिणी स्वत: घराबाहेर आली. तिच्या पाठोपाठ मंगेशही आला. रुग्णवाहिकेतून रुक्मिणीला व मंगेशला सुरुवातीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात व त्यानंतरपुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. पुण्यात उपचारांदरम्यान रुक्मिणीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मंगेशच्या फिर्यादनुसार रूक्मिणीच्या ऑनर किलिंगचा गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू