बॅँकेच्या भरण्यात बनावट नोटा

By Admin | Updated: February 24, 2016 23:43 IST2016-02-24T23:39:44+5:302016-02-24T23:43:03+5:30

अहमदनगर : एमआयडीसीमधील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पैशांचा भरणा करताना अज्ञात व्यक्तीने शंभर, पाचशे आणि हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात वापरल्या आहेत.

Counterfeit currency not paying for the bank | बॅँकेच्या भरण्यात बनावट नोटा

बॅँकेच्या भरण्यात बनावट नोटा

अहमदनगर : एमआयडीसीमधील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पैशांचा भरणा करताना अज्ञात व्यक्तीने शंभर, पाचशे आणि हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात वापरल्या आहेत. ३१ डिसेंबर २०१५ ते २७ जानेवारी २०१६ या कालावधीत भरणा केलेल्या नोटांमध्ये या बनावट नोटांचा वापर झाला. या प्रकरणी आनंद राजू प्रधान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नोटांमध्ये शंभर रुपयांची एक, पाचशे रुपयांच्या तीन आणि एक हजार रुपयांच्या चार बनावट नोटा वापरल्याचे आढळून आले.

Web Title: Counterfeit currency not paying for the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.