समुपदेशन आणि प्लेसमेंट या एकाच नाण्याच्या दोन बाजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:17+5:302021-04-02T04:21:17+5:30
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी चार ...

समुपदेशन आणि प्लेसमेंट या एकाच नाण्याच्या दोन बाजू
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी चार दिवसीय मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. शरद गडाख, डॉ. मिलिंद अहिरे, डॉ. जी. के. ससाणे, डॉ. मनोहर धादवड, डॉ. भरत भालेराव, डॉ. एम. आर. पाटील, डॉ. प्रशांत पवार, डॉ. संजय सपकाळ उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या आढाव्याचे सादरीकरण व सूत्रसंचालन डॉ. मनोहर धादवड यांनी केले. आभार डॉ. जी. के. ससाणे यांनी मानले. कार्यक्रम समन्वयक म्हणून डॉ. डी. एन. फराटे, पद्मकुमार पाटील व संतोष चौगुले यांनी काम पाहिले.