संचारबंदीत फिरणे नगरसेवकाला पडले महागात, श्रीरामपुरात पोलिसांची कारवाई : राजेंद्र पवारांवर गुन्हा दाखल; २५ जणांना हिसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 18:02 IST2020-04-13T18:02:11+5:302020-04-13T18:02:22+5:30

श्रीरामपूर : शहरात संचारबंदीच्या काळात मोकाट फिरणाऱ्या २५ नागरिकांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे वाहनही पोलिसांनी जप्त करत त्यांच्यासह एकूण २५ जणांवर गुन्हा दाखल केला. अत्यावश्यक सेवेचा फलक लावून शहरात फिरणे नगरसेवक पवार यांना चांगलेच महागात पडले आहे.

 Councilor forced to turn around in communications, police action in Shrirampur 7 of them laughed | संचारबंदीत फिरणे नगरसेवकाला पडले महागात, श्रीरामपुरात पोलिसांची कारवाई : राजेंद्र पवारांवर गुन्हा दाखल; २५ जणांना हिसका

संचारबंदीत फिरणे नगरसेवकाला पडले महागात, श्रीरामपुरात पोलिसांची कारवाई : राजेंद्र पवारांवर गुन्हा दाखल; २५ जणांना हिसका

श्रीरामपूर : शहरात संचारबंदीच्या काळात मोकाट फिरणाऱ्या २५ नागरिकांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे वाहनही पोलिसांनी जप्त करत त्यांच्यासह एकूण २५ जणांवर गुन्हा दाखल केला. अत्यावश्यक सेवेचा फलक लावून शहरात फिरणे नगरसेवक पवार यांना चांगलेच महागात पडले आहे.
श्रीरामपूर पोलिसांनी सोमवारी धडक मोहीम हाती घेतली. संचारबंदीचे सर्व नियम मोडून भटकणाºया व अत्यावश्यक सेवेचे फलक लावून कायदा पायदळी तुडवणारा नागरिकांवर पोलिसांनी जरब बसवला. शहरातील मुख्य रस्ता, शिवाजी रस्ता, संगमनेर रस्ता, नेवासे रस्ता व बेलापूर रस्त्यावर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे रस्ते थोड्याच वेळात निर्मनुष्य झाले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत नगरसेवक राजेंद्र पवार हे देखील सुटू शकले नाहीत. नगरसेवक पवार हे गेल्या काही दिवसांपासून धान्य वाटप तसेच औषध फवारणीचे काम करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात झळकले होते. त्यांच्या कारला अत्यावश्यक सेवेचा फलकही लावण्यात आला होता. त्यांच्या कारसह रिक्षा जीप व दुचाकी अशा २५ वाहनावर कारवाई करत ते शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह सर्व नगरसेवकांना संचारबंदीच्या काळात शहरात फिरण्यास बंदी घातली होती अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी लोकमतला दिली. नगरसेवकांनी अत्यावश्यक कामासाठी प्रशासनाला सूचना द्यावी. मात्र विनाकारण रस्त्यावर फिरू नये अशी जिल्हाधिकाºयांची सूचना होती. संपूर्ण जिल्ह्यासाठी ते लागू आहेत. मात्र तरीहीशहरात नगरसेवक फिरताना आढळून आले होते.
या कारवाईमुळे आता शहरात अनावश्यक फिरणाºया राजकीय कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी यांना चाप बसणार आहे. शहर पोलिसांनी उशिरा का होईना कारवाई केली आहे.
श्रीरामपुरात आपल्या प्रभागातील नगरसेवक संचारबंदी च्या काळात काय करत आहे याविषयीचे मेसेज सोशल मीडियावर झळकत होते. त्यातून नगरसेवकांचे सामाजिक कायार्चे छायाचित्रे टाकली जात होती. नागरिकही आवडीने हे विषय चघळत होते.

Web Title:  Councilor forced to turn around in communications, police action in Shrirampur 7 of them laughed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.