Coronavirus : दिलासादायक ! बुधवारचे 84 अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:13 IST2020-04-09T13:13:02+5:302020-04-09T13:13:41+5:30
जिल्ह्यासाठी काहीशी दिलासादायक बातमी आली असून गेल्या चोवीस तासांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही.

Coronavirus : दिलासादायक ! बुधवारचे 84 अहवाल निगेटिव्ह
अहमदनगर : जिल्ह्यासाठी काहीशी दिलासादायक बातमी आली असून गेल्या चोवीस तासांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. बुधवारी पाठवलेले सर्व 84 अहवाल आज निगेटिव्ह आले.
अहमदनगरमध्ये एकूण 26 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यातील एक बीड जिल्ह्यातील आहे. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला होता. दरम्यान अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे बुधवारी एकूण 84 स्राव नमुने पाठवले होते. त्यातील 23 अहवाल बुधवारी रात्री तर उर्वरित 61 अहवाल गुरुवारी सकाळी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी हे एक दिलासादायक चित्र असल्याची प्रतिक्रिया जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली. दरम्यान गुरुवारी सकाळी पुन्हा 69 स्राव नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता या अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.