राहुरी तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी; बाधितांची संख्या १६०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 11:51 IST2020-08-10T11:49:59+5:302020-08-10T11:51:55+5:30

 राहुरी तालुक्यात  रविवारी (९ आॅगस्ट) सुमारे दहा जणांना कोरोनाची बाधा झाली. तर कात्रड येथील एक ७५ वर्षीय महिलेचा कोरणा मुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता चार इतकी झाली आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या १६० वर गेली आहे.

Corona's fourth victim in Rahuri taluka; The number of victims is 160 | राहुरी तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी; बाधितांची संख्या १६०

राहुरी तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी; बाधितांची संख्या १६०

 राहुरी : तालुक्यात  रविवारी (९ आॅगस्ट) सुमारे दहा जणांना कोरोनाची बाधा झाली. तर कात्रड येथील एक ७५ वर्षीय महिलेचा कोरणा मुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता चार इतकी झाली आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या १६० वर गेली आहे.

           रविवारी दहा जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यात बारागाव नांदूर येथील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील  तीन पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. गुहा येथील एक महिलेला  कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. तर रॅपिड  अँटी जेन तपासणीत बोधेगाव येथील एक व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आढळून आला आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.

Web Title: Corona's fourth victim in Rahuri taluka; The number of victims is 160