जिल्ह्यात आज कोरोना लस होणार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST2021-01-13T04:54:22+5:302021-01-13T04:54:22+5:30
नगर जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी गेल्या आठवड्यात मनपा हद्दीत, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयात ड्राय रन करण्यात आला. हा ...

जिल्ह्यात आज कोरोना लस होणार दाखल
नगर जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी गेल्या आठवड्यात मनपा हद्दीत, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयात ड्राय रन करण्यात आला. हा ड्राय रन यशस्वी झाल्याने आता शनिवारपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यात ३१ हजार ९२१ सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि परिचारिका यांना लस देण्यात येणार आहे. बुधवारी ही लसे जिल्ह्यात दाखल होणार आहे.
महापालिका हद्दीत ८, तर ग्रामीण रुग्णालयांत १३ अशा एकूण २१ ठिकाणी लसीकरण केंद्र असून या प्रत्येक केंद्रावर दररोज २५ जणांना लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून समजली.
............
या ठिकाणी आहेत लसीकरण केंद्र
जिल्हा रुग्णालय, पाथर्डी आणि कर्जतचे उपजिल्हा रुग्णालय, जामखेड, शेवगाव, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, अकोले, पारनेर, श्रीगोंदा, नेवासा ग्रामीण रूग्णालय, नगर शहरातील मनपाचे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय, तोफखाना आरोग्य केंद्र, मुकूंदनगर आरोग्य केंद्र, जिजामाता आरोग्य केंद्र, नागापूर आरोग्य केंद्र, केडगाव आरोग्य केंद्र, जुने सिव्हील आणि महात्मा फुले आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहेत.